Friday, December 30, 2022

Rakhmabai and Aadhar Card

Quite,warm afternoon it was. A random rural highway in Western Maharashtra where the sun was high in the sky shooting scorching heat. A bus was moving like hummingbird on the highway. The driver knew the destination, so the bus but passengers? They were enjoying their afternoon naps while the bus conductor was almost done with waking everyone up as their stop arrived. 

The bus stopped at a stop known as Tarangewadi. Four elderly people, two men and two women boarded the bus. Their looks could tell their tales of life- exhausting and tiresome. One was elderly couple. The man was well built. His wife followed his way from the bus door to the seat. "Seat there", he commanded pointing out to the seat next to him. The other elderly man was typical rural folk. Wearing his Topi and Shirt, he helplessly looked here and there for seats. An another women was doing the same but she was quite confident that she would get one. 

She was Rakhmabai, probably in 70s, wearing Nauvari, a Marathi drapery. Her Nauvari was not of the fashionable ones of urban elite wear in fancy marriages but of the common peasant toiling hard in farms. She found seat near window at the backside. Four folks from Tarangewadi got seats, although different ones.

The bus conductor started from the elderly couple. "Where?", he asked to the man. The man answered, "Natepute," while showing his Aadhar Card. His wife did the same. Both of them didn't pay anything but got the tickets. In Maharashtra, senior citizens above 75 years can travel freely using State bus transport. The next turn was of another elderly man, Tatya, lets name him. Conductor reached to Tatya's seat. Again the same question. Tatya said while showing his State Transport Senior Citizen card.  "One for Barad. I'm also senior citizen above 75 years" Barad is a small town, a next stop after Tarangewadi for buses traveling to Pandharpur and other main stations. 

ST, short stories, maharashtra, rural india, pandharpur, elederly couple, aadhar card, senior citizen

The conductor asked for Aadhar Card. Tatya got irritated. In his aggressive tone, he roared ,"Why do I need Aadhar Card now? Is this not enough?" The conductor politely said," The machine needs Aadhar number to give you free ticket, otherwise you have to take half ticket without Aadhar Card. Tatya was  in no mood to listen. The argument started. 

There enters Rakhmabai into the argument. After hearing conductor's sentence that he would pay for half ticket but Tatya has to take it as he have no Aadhar card, she targeted Tatya. Standing up in running bus from her seat, she asked Tatya to pay for half ticket. "If you don't pay, Saheb's job will be in danger, why don't you pay for half ticket of Rs 25 while he is even ready to drop you home next time you need to travel?"

The conductor was confused. Giving sheepish smile to Rakhmabai, he requested her to sit down and not to interfere. But Rakhmabai continued confidently. By now all the passengers in the bus were looking at her what she has to say. She was eager to talk. In her hands, she had Aadhar Card, Senior Citizen Card and also Voter ID card. Referring to Tatya, she thundered, "Why can't you bring Aadhar Card if you have to travel free? I have three cards despite being a woman. You are man still you can't even bring a Aadhar Card."

The conductor's sheepish smile turned into laughter. He again requested Rakhmabai to sit down. The elderly man also got into action. In his proper Deccan tone, he said to Tatya, "This is Aadhar card, everybody has it since childhood, you should also have it." Tatya had no option now than to pay. 

As the conductor again politely tried to convince Tatya that he has no option. "I'm telling you what Government orders are. I don't want you to pay, but its my job." Tatya was silent by now.Afterall his Rs 25 were gone. The bus catched up speed to reach Barad, where Tatya had to reach. The four unknowns and the conductor got into their own worlds forgetting the argument about the small but important piece of paper called as Aadhar card that made their lives better and complex at the same time.

                                                                                                                          Written by

                                                                                                                           Chaitanya

रखमाबाई आणि आधार कार्ड

एका निवांत दुपारी एक ST बस पेंगत पेंगत रस्त्यावरून धावत होती. कडाक्याच्या थंडीऐवजी तावणारं ऊन बघून ती तरी काय करणार म्हणा. नशीब हेच कि ड्रायव्हर जागा होता आणि बरोबर ठिकाणी पोहोचवत होता. बाकी प्रवासी डुलक्या घेत होते. कंडक्टरला तिकीट काढण्यापेक्षा प्रवाशांना झोपेतून उठवायचं काम लागलं होतं . डुलत डुलत बस तरंगेवाडीला थांबली.

चार म्हातारी माणसं, दोन बापे आणि दोन बाया म्हणजे दोन पुरुष व दोन महिला बसमध्ये आले. त्यांचे थकलेले आणि केविलवाणे चेहरेच त्यांच्याविषयी बरंच काही सांगून जात होते. त्यातले दोघे नवरा बायको होते. सत्तरीच्या घरात असावेत. त्यातला माणूस जागा शोधत शोधत मागे गेला. दोन सीटा मिळाल्या की तो समाधानी झाला. बायकोला आज्ञा झाली, "बस तिथं. " दुसरा इसम हा पण सत्तरीत असावा. त्याच नाव असावं तात्या.  त्याच्या वारकरी टोपीत अँड आणि सदऱ्यातून येणार घाम पुसत तो मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याच्या शेजारच्या सीटवर ती चौथी आज्जी बसली. 

तिचं नाव रखमाबाई. ती पण सत्तरीत असावी. शेलक्या पद्धतीने नऊवारी नेसून ती सीट शोधत होती मोठ्या आत्मविश्वासाने. तिची नऊवारी मुंबई पुण्यातल्यासारखी लग्नात मिरवणारी नव्हती. शेतात काबाडकष्ट करणारी नऊवारी तिला मोठा अभिमान देऊन जात होती.

तरंगेवाडीच्या प्रवाशांची तिकिटे कंडक्टर काढत होता. त्या वृद्ध जोडप्यापासून त्यानं सुरुवात केली. "कुठं जायचंय, मामा?" आपलं आधार कार्ड दाखवत, टोपी सांभाळत  मामा म्हणाले,"नातेपुते, दोन. " तिकीट घेतलं, पैसे मात्र दिले नाहीत. महाराष्ट्र सरकार ७५ वर्षांवरील नागरिकांना एस.टी. ने मोफत प्रवास करायची सुविधा देतं. कंडक्टर पुढे सरकला. आता नंबर होता तात्यांचा. कंडक्टर ने परत तोच प्रश्न केला, "कुठे जायचं?" तात्या म्हणाले, "बरड, मी पण पंच्याहत्तर ओलांडल्यात." आपले एस. टी .चं कार्ड दाखवत तात्या गरजले. बरड म्हणजे फलटण पंढरपूर रोडवरच छोटंसं गाव. 


कंडक्टरने आधार कार्ड मागितलं . तात्या वैतागून म्हणाले, "एक कार्ड दिलंय नव्ह, अजून दुसरं कशाला?" कंडक्टर नम्रपणे म्हणाला ," अहो, तुम्हाला मोफत तिकीट द्यायचं  तर मशीन आधार नंबर मागतंय नाहीतर अर्धं  तिकीट घ्यावं लागंल तुम्हाला." ऐकतायत ते तात्या कुठले. कंडक्टर आणि तात्यात बाचाबाची सुरु झाली.

तेवढ्यात रखमाबाई आपल्या सीटवरून उठली. नऊवारी सावरत तात्यावर ओरडली, "आरं, साहेबाची नोकरी जाईल तुला असच फुकट बसवलं तर, कळायला नको का तू पंच्याहत्तरच्या वर हाय ते? लगा, पंचवीस रुपयाचं तिकीट काढायला किती त्रास देतोय, ते म्हणतायत नव्ह पुढल्या खेपेला घरी येतो सोडायला..!" कंडक्टर बावचळला. रखमाबाईला म्हणाला, "तुम्ही खाली बसा, कशाला मध्ये पडताय भांडणाच्या?"

सगळी बस रखमाबाईकडं बघत होती. रखमाबाईने पुढे बोलायला चालू केलं. तिच्या हातात आधार कार्ड तर होतच पण सोबत मतदान ओळखपत्र, एस.टी. कार्ड पण होता. तात्या तिच्या निशाण्यावरच होता अजून. "आर, मी बाई असून माझ्याकडं तीन कार्ड हाईत, तुला एक कार्ड आणायला कंटाळा येतुय का ?"

बावचळलेला कंडक्टर हसायला लागला. रखमाबाईला परत एकदा बस म्हणाला. तात्याकडे आता पर्याय नव्हता. तेवढ्यात मामाने पण आपला आधार कार्ड पुढे केला. आपल्या दक्खनी उर्दूत तात्याला बोलला, "इसको आधार कारड बोलते है, ये घेऊन आने का होता है , तभीच फुकट तिकीट मिळता है! आजकाल ये लोगोंको लहानपणीच मिळता  है. " तात्याने आपल्या सदऱ्यातून २५ रुपये काढले आणि टेकवले कंडक्टर च्या हातावर. कंडक्टर अजून पण तात्याला समजावत होता, " मला कुठं वाटतंय तुम्ही तिकीट काढावं? मी आपला जी. आर. आलाय तो सांगतोय तुम्हाला. पुढच्या वेळेस घेऊन या आधार कार्ड. "

तात्या आता शांत बसला. शेवटी पंचवीस रुपयाचा फटका बसला त्याला. रखमाबाई खिडकीच्या बाहेर बघत होती. कंडक्टर आपल्या सीटवर निघून गेला. मामाने खिशातून चुना काढला. सगळे आपल्याआपल्या जगात निघून गेले, त्या छोट्याश्या आधार कार्ड नावाच्या कागदाला विसरून. 

                                                                                                                                लेखक
चैतन्य




Saturday, December 24, 2022

युक्रेनचं युद्ध,सरते वर्ष आणि जागतिक बदलाचे वारे

२०२२ चा अखेरचा आठवडा. रशियाची युक्रेन आघाडी अजून धगधगत आहे आणि युक्रेनचा प्रतिकारसुद्धा. २४ फेब्रुवारीपासून जवळपास वर्षभर रोज आपण युक्रेनबद्दल ऐकत आलो. आजघडीला दुर्मिळ असणारी अशी थेट राष्ट्रांराष्ट्रातील युद्धे त्यातल्या त्यात इतका दीर्घकाळ चालणारं युद्ध त्याच्यासोबत बरेच संदेश घेऊन येत. सरत्या वर्षाला निरोप देताना युक्रेन प्रश्नाने जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात केलेली उलथापालथ यांचा आढावा घेणे हेच औचित्य.


रशियाचा पुतीन राजवटीत ला आणि एकंदर  प्रवास बघितला तर रशियासारखा अवाढव्य देश नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांना आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असतो. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जॉर्जिया (२००८), क्रिमिया (२०१४) ची युद्धे रशियाने या छोट्या देशांवर लादली. उद्दिष्ट हे कि अमेरिकेला (नाटोला ) आपल्या भूमीपासून दूर ठेवा. जगाच्या इतिहासात बलाढ्य राष्ट्रे छोट्या देशांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात हे सर्वमान्य सत्य आहे. युक्रेनचा सुरु असलेला प्रतिकार आणि रशिया ने खेरसन सारख्या महत्वाच्या प्रदेशातून घेतली माघार दाखवून देते कि आपल्या देशाच्या बचावासाठी एक छोटा देश पण मोठ्या देशाशी लढू शकतो. 

रशियाची खेरसन मधून माघार


पण युक्रेनचा प्रतिकारास पाठिंबा आहे तो अमेरिकेचा आणि युरोपचा. ट्रूम्पकाळात दूर गेलेले हे पारंपरिक मित्र युक्रेनच्या मुद्द्यावर यावर्षी एकत्र येताना दिसतात. नाटोच्या मुद्द्यावरून मतभेद असले तरी नाटो हि आजही अमेरिका आणि युरोप साठी का महत्वाची ठरते याच उत्तरही युक्रेनमध्ये मिळत. रशिया. रशिया आणि अमेरिका आणि आता सोबतीला चीन यांच्यातील जागतिक कुरघोडीचे राजकारण युक्रेनसारख्या युद्धात प्रकर्षाने बाहेर येते. रशियाला आपल्या सुरक्षेची काळजी तर चीनला स्वस्त दरात इंधन आणि अजून गोष्टी हव्यात. रशिया यूरोपमध्ये घुसेल अशी युरोपियन युनिअनला भीती. अमेरिका थेट युद्धात तर नाही पण चीन आणि रशिया मिळून आपलया वर्चस्वाला मोठा देईल असे त्यांना वाटते.

अशा गुन्तागुन्तीच्या राजकारणात तेल, नैसर्गिक वायू, तेलबिया यांसारख्या गोष्टी प्रवेश करतात. रशिया युक्रेनमधून युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी तेलवाहिनी बंद करायच्या धमक्या वर्षभर देत आहे. पुरवठादार युक्रेन तणावात असल्याने तेलबिया, अन्नधान्याच्या किमती कैकपटीने वाढल्या.  त्यात अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध रशियन तेलाच्या किमतीपण वाढवून गेले. एका युद्धाने इतके अनर्थ केले. जागतिकीकरणानंतरचे जग जोडलेले आहे असे आपण म्हणतो. कोव्हिडनंतर जागतिकीकरण मंदावल आहे अशा चर्चा होत्या. युक्रेन युद्धाचे आर्थिक परिणाम दाखवून देतात कि अजूनही जगाच्या एका भागात पडलेली ठिणगी वणवा पेटवू शकते. 

२०२२ मध्ये तेलांच्या किमतीचा चढता आलेख


शेवटचा मुद्दा असा कि पुतीन यांनी वारंवार दिलेल्या अण्वस्त्र वापराच्या धमक्या. कदाचित क्युबा नंतर पहिल्यांदाच जगाला अण्वस्त्रांची दाहकता जाणवली. संयुक्त राष्ट्रसंघासारखी संस्था अण्वस्त्र प्रश्न काय किंवा युक्रेन काय, आपला प्रभाव दाखवू शकली नाही. अण्वस्त्रांच्या पुनः प्रकटीकरणासोबतच या संघटनेच्या उपयुक्ततेचा मुद्दा देखील पुढे आला. जागतिक शांतता मृगजळ आहे असे अजूनही वाटते कारण एका बाजूला पुतीन सारखे नेते विनाश शक्य आहे हे दाखवतात तर संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याचे उद्दिष्ट आहे कि जागतिक शांतता  प्रस्थापित करणे, युद्धे थांबविण्यास अपयशी ठरतो.

युक्रेनयुद्धात दोन्ही बाजूंवर आलेला ताण पाहिला तर चर्चा करण्याची हीच वेळ आहे हे खरे. मात्र युद्ध थांबायची शक्यता पुतीन यांच्या भूमिकेवर आहे. त्यांनी जर अशीच धमकीवजा भाषा आणि कृती सुरु ठेवल्या तर युद्ध अजून लांबेल आणि त्याचे परिणाम विचार करण्यापलिकडे आहेत.

त्यामुळे सरत्या वर्षासोबत आठवणी घेऊन जाताना युक्रेनचं युद्धही आपण सोबत घेऊन जातोय आणि आशा करूयात कि नवीन वर्ष शांततेचा संदेश सोबत घेऊन येईल.




Chhatrapati Shivaji and the Idea of Swarajya

Swarajya. We,especially students of political science and social sciences in general often study ideas like Sovereignty, nation state, terri...