२०२२ चा अखेरचा आठवडा. रशियाची युक्रेन आघाडी अजून धगधगत आहे आणि युक्रेनचा प्रतिकारसुद्धा. २४ फेब्रुवारीपासून जवळपास वर्षभर रोज आपण युक्रेनबद्दल ऐकत आलो. आजघडीला दुर्मिळ असणारी अशी थेट राष्ट्रांराष्ट्रातील युद्धे त्यातल्या त्यात इतका दीर्घकाळ चालणारं युद्ध त्याच्यासोबत बरेच संदेश घेऊन येत. सरत्या वर्षाला निरोप देताना युक्रेन प्रश्नाने जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात केलेली उलथापालथ यांचा आढावा घेणे हेच औचित्य.
रशियाचा पुतीन राजवटीत ला आणि एकंदर प्रवास बघितला तर रशियासारखा अवाढव्य देश नेहमीच आपल्या शेजारी राष्ट्रांना आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असतो. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जॉर्जिया (२००८), क्रिमिया (२०१४) ची युद्धे रशियाने या छोट्या देशांवर लादली. उद्दिष्ट हे कि अमेरिकेला (नाटोला ) आपल्या भूमीपासून दूर ठेवा. जगाच्या इतिहासात बलाढ्य राष्ट्रे छोट्या देशांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात हे सर्वमान्य सत्य आहे. युक्रेनचा सुरु असलेला प्रतिकार आणि रशिया ने खेरसन सारख्या महत्वाच्या प्रदेशातून घेतली माघार दाखवून देते कि आपल्या देशाच्या बचावासाठी एक छोटा देश पण मोठ्या देशाशी लढू शकतो.
रशियाची खेरसन मधून माघार |
पण युक्रेनचा प्रतिकारास पाठिंबा आहे तो अमेरिकेचा आणि युरोपचा. ट्रूम्पकाळात दूर गेलेले हे पारंपरिक मित्र युक्रेनच्या मुद्द्यावर यावर्षी एकत्र येताना दिसतात. नाटोच्या मुद्द्यावरून मतभेद असले तरी नाटो हि आजही अमेरिका आणि युरोप साठी का महत्वाची ठरते याच उत्तरही युक्रेनमध्ये मिळत. रशिया. रशिया आणि अमेरिका आणि आता सोबतीला चीन यांच्यातील जागतिक कुरघोडीचे राजकारण युक्रेनसारख्या युद्धात प्रकर्षाने बाहेर येते. रशियाला आपल्या सुरक्षेची काळजी तर चीनला स्वस्त दरात इंधन आणि अजून गोष्टी हव्यात. रशिया यूरोपमध्ये घुसेल अशी युरोपियन युनिअनला भीती. अमेरिका थेट युद्धात तर नाही पण चीन आणि रशिया मिळून आपलया वर्चस्वाला मोठा देईल असे त्यांना वाटते.
अशा गुन्तागुन्तीच्या राजकारणात तेल, नैसर्गिक वायू, तेलबिया यांसारख्या गोष्टी प्रवेश करतात. रशिया युक्रेनमधून युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी तेलवाहिनी बंद करायच्या धमक्या वर्षभर देत आहे. पुरवठादार युक्रेन तणावात असल्याने तेलबिया, अन्नधान्याच्या किमती कैकपटीने वाढल्या. त्यात अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध रशियन तेलाच्या किमतीपण वाढवून गेले. एका युद्धाने इतके अनर्थ केले. जागतिकीकरणानंतरचे जग जोडलेले आहे असे आपण म्हणतो. कोव्हिडनंतर जागतिकीकरण मंदावल आहे अशा चर्चा होत्या. युक्रेन युद्धाचे आर्थिक परिणाम दाखवून देतात कि अजूनही जगाच्या एका भागात पडलेली ठिणगी वणवा पेटवू शकते.
२०२२ मध्ये तेलांच्या किमतीचा चढता आलेख |
शेवटचा मुद्दा असा कि पुतीन यांनी वारंवार दिलेल्या अण्वस्त्र वापराच्या धमक्या. कदाचित क्युबा नंतर पहिल्यांदाच जगाला अण्वस्त्रांची दाहकता जाणवली. संयुक्त राष्ट्रसंघासारखी संस्था अण्वस्त्र प्रश्न काय किंवा युक्रेन काय, आपला प्रभाव दाखवू शकली नाही. अण्वस्त्रांच्या पुनः प्रकटीकरणासोबतच या संघटनेच्या उपयुक्ततेचा मुद्दा देखील पुढे आला. जागतिक शांतता मृगजळ आहे असे अजूनही वाटते कारण एका बाजूला पुतीन सारखे नेते विनाश शक्य आहे हे दाखवतात तर संयुक्त राष्ट्रसंघ, ज्याचे उद्दिष्ट आहे कि जागतिक शांतता प्रस्थापित करणे, युद्धे थांबविण्यास अपयशी ठरतो.
युक्रेनयुद्धात दोन्ही बाजूंवर आलेला ताण पाहिला तर चर्चा करण्याची हीच वेळ आहे हे खरे. मात्र युद्ध थांबायची शक्यता पुतीन यांच्या भूमिकेवर आहे. त्यांनी जर अशीच धमकीवजा भाषा आणि कृती सुरु ठेवल्या तर युद्ध अजून लांबेल आणि त्याचे परिणाम विचार करण्यापलिकडे आहेत.
त्यामुळे सरत्या वर्षासोबत आठवणी घेऊन जाताना युक्रेनचं युद्धही आपण सोबत घेऊन जातोय आणि आशा करूयात कि नवीन वर्ष शांततेचा संदेश सोबत घेऊन येईल.
No comments:
Post a Comment